आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरकरांना ‘जलदूत’द्वारे आतापर्यंत मिळाले पाच कोटी लिटर पाणी! CM समाधानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली जिल्ह्यातून लातूरला आतापर्यंत 5 लाख कोटी लिटर पाणी पोहचवले आहे. - Divya Marathi
सांगली जिल्ह्यातून लातूरला आतापर्यंत 5 लाख कोटी लिटर पाणी पोहचवले आहे.
लातूर- लातूर शहरातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीची उपाययोजना म्हणून रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय लातूरकरांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि मदतीचा ठरला आहे. जलदूत या विशेष रेल्वेगाडीने आतापर्यंत 27 फेऱ्यांद्वारे एकूण 4 कोटी 95 लाख लिटर पाणी लातूरात पोहचवले आहे. लातूरच्या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी प्रसंगी रेल्वेने पाणीपुरवठा करु, या आश्वासनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्याने पूर्तता केली आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज येथून 25 लाख लिटर पाणी घेऊन रेल्वेची 27 वी फेरी शनिवारी लातूरात दाखल झाली. ही रेल्वे लातूरला पोहोचताच सुमारे पाच कोटी लिटर पाण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि तेथील जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने या भागाचा दौरा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथे झालेल्या विशेष बैठकीत उपाययोजनांबाबत चर्चा झाली तसेच आवश्यकता भासल्यास लातूर शहरासाठी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले होते. त्यानंतर परिस्थितीचा विस्ताराने आढावा घेऊन लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
लातूर येथील रेल्वे स्थानक परिसराची पाहणी करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लातूरला मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मिरज येथून 10 वॅगनने 5 लाख लिटर पाणी घेऊन पहिली रेल्वे 12 एप्रिल रोजी पोहोचली. यापद्धतीने 9 दिवस 45 लाख लिटर पाणी पोहोचवण्यात आले. त्यानंतर 20 एप्रिलपासून 50 वॅगनने 25 लाख लिटर पाणी नेण्यास सुरुवात झाली. लातूर शहरासाठी रेल्वेने आजवर 4 कोटी 70 लाख लिटर पाणी देण्यात आले असून शुक्रवारी 25 लाख लिटर पाणी घेऊन 27 वी फेरी मिरजहून लातूरला रवाना झाली. जी रेल्वे आज सकाळी लातूरात पोहोचली.
पुढे आणखी वाचा, लातूरात कशी व्यवस्था केली आहे लोकांपर्यंत पाणी पोहचवण्याची...
बातम्या आणखी आहेत...