आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानूषीने दिले PAK माध्यमांना उत्तर, म्हणाली मिस वर्ल्ड होण्यासाठी सुंदर मनही तितकेच गरजेचे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेता आमिर खान याच्या चित्रपटात काम करण्याची आपली इच्छा असून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या आवडते, या शब्दात मानुषीने आज पहिल्यांदाच आपली 'मन की बात' मीडियाला सांगितली. 

 

मानुषी काय म्हणाली?
प्रश्न- ब्यूटी विथ मिशनमागे काय कारण आहे?
उत्तर- मला वाटते आपल्या देशात स्वच्छतेविषयी जास्त जागरुकतेची गरज आहे. माझ्या घरी काम करणाऱ्या महिलेला मुल नसल्याने 3 लग्न करावी लागली. आपल्या देशात सॅनिटरी नॅपकिनविषयी देखील जागरुकता नाही. त्यामुळे मी ब्यूटी विथ मिशन निवडले. 

 

प्रश्न- तुम्ही रिता फारिया आणि आमिर खान यांच्याशी चर्चा केली?
उत्तर- मी रिता आणि आमिरसोबत चर्चा केलेली नाही. रिता देशाची पहिली मिस वर्ल्ड होती. मी त्यांना एक ईमेल केला होता. पण त्याचे उत्तर अद्याप आलेले नाही. अपेक्षा आहे की डबलिनमध्ये मी त्यांची भेट होईल.

 

प्रश्न- आपल्याला मिस वर्ल्ड बनल्याबद्दल काय वाटते? काय भारतीय महिलांची परिस्थिती बदलेल?
उत्तर- भारतीय महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत. आम्ही त्याचा सामना करत असतो. मला वाटतं की काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.

 

प्रश्न- तुम्ही मिस वर्ल्ड बनल्यानंतर पाकिस्तानात यावर चर्चा होत आहे की पाकिस्तानी मुली अधिक सुंदर आहेत पण बुरख्यासारख्या प्रथेमुळे आपल्या सौदर्य जगासमोर त्या दाखवू शकत नाही?
उत्तर- बाह्य नाही अंतर्गत सौदर्यही तेवढेच महत्वाचे आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेत सामील होणाऱ्या सगळ्याच मुली खूपच सुंदर असतात. आपण स्वप्न बाळगुनच जगले पाहिजे. मला माझ्या कुटूंबियांची नेहमीच साथ मिळाली. आपले स्वप्न साकारण्यासाठी स्वातंत्र्य गरजेचे आहे. 

 

प्रश्न- तुम्हाला कोणत्या प्रकारचे चित्रपट आवडतात? तुमचे आवडते अभिनेते, अभिनेत्री कोण आहेत?
उत्तर- मी चित्रपट फारसे पाहत नाही मला वाचनाची आवड आहे. माझ्यासाठी सगळेच अभिनेते सुंदर आहेत. कोणा एकाचे नाव घेणे दुसऱ्यावर अन्याय करण्यासारखे आहे. माझी आमिर खान यांच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. याला कारण त्याच्या चित्रपटात काहीतरी संदेश असतो हे आहे. प्रियंका चोप्राही मला आवडते. पण बॉलीवूड अजुनतरी माझ्या डोक्यात नाही. 

 

प्रश्न- जबाबदाऱ्यांसाठी किती तयार आहात?
उत्तर- माझ्यावर कोणतीच जबाबदारी नसल्याने मला आव्हान स्वीकारण्यास आवडते. 

 

प्रश्न- मिस वर्ल्डसाठी बॉलीवूडची थीम का निवडलीत?
उत्तर- मी बॉलीवूडद्वारे भारतीय संस्कृती दाखवू इच्छित होते. कारण बॉलीवूडला सगळे जग ओळखते. त्यामुळे नगारा डान्सची मी निवड केली. त्यासाठी गरबा शिकले. मला जगाला भारत दाखवायचे होते. मी देशाची आभारी आहे कारण माझे त्यांनी मनापासून स्वागत केले.

 

प्रश्न- हरियाणा सरकारबद्दल काय म्हणाल?
उत्तर- मी हरियाणा सरकारचा आभारी आहे. त्यांनी मला सन्मान दिला आणि एक ऑफिस सुध्दा दिले.  ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ अभियान पुढे नेण्यासाठी मी नक्कीच सहकार्य करेल.  

 

पुढील स्लाईडवर पाहा 'मानुषी'चे आणखी फोटो 

बातम्या आणखी आहेत...