आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सिद्धीविनायकाच्या चरणी, कुटुंबियांसोबत केली आरती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आज (सोमवार) सकाळी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. तिने आई-वडिलांसोबत बाप्पाचे दर्शन घेतले. मानुषी जवळपास अर्धा तास सिद्धीविनायकाच्या दरबारात होती. तिने बाप्पाची आरतीही केली.

 

मुंबईत मानुषीचे झाले जोरदार स्वागत...
- मानुषी शनिवार (ता. 25 ) रात्री उशीरा मुंबई एअरपोर्ट पोहोचली. तिचे जोरदार स्वागत करण्‍यात आले.
- एअरपोर्टवर तिची एक झलक पाहाण्यासाठी हजारो फॅन्सनी गर्दी केली होती.

 

शास्त्रीय नृत्यात पारंगत
- मानुषीला पॅराग्लायडिंग, बंजी जंपिंग आणि स्कुबा डायव्हिंग आवडते.
- तिने शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले आहे.
- भारतातून प्रियंका चाेप्रा व्यतिरिक्त 1966 मध्ये रिता फारिया, 1994 मध्ये ऐश्वर्या राय, 1997 मध्ये डायना हेडन आणि 1999 मध्ये युक्ता मुखी मिस वर्ल्ड झाली हाेती.

 

मानुषी, नरेंद्र मोदींची फॅन
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ही हरियाणातील सोनिपत येथील राहाणारी आहे. ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे. 7 मे 1997 रोजी दिल्लीत मनुषीचा जन्म झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फॅन असलेल्या मनुषी हिला माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा सारखे बनण्याची इच्छा आहे.

 

मानुषी छिल्लर फायनल राउंडमध्ये विचारण्यात आला हा प्रश्न...
कोणत्या प्रोफेशनमध्ये सर्वाधिक सॅलरी द्यायला हवी आणि का? मानुषीला फायनल राउंडमध्ये ज्युरी मेंबर्सनी हा प्रश्न केला होता. त्यावर मानुषी म्हणाली, 'आईला सर्वात जास्त सॅलरी मिळायला हवी. आईला कॅश सॅलरी देऊन भागणार नाही, तिचा गौरव व्हावा. तिला भरपूर प्रेम मिळायला हवे.'

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... या 5 जणींनी यापूर्वी देशाला मिळवून दिला हा बहुमान!

बातम्या आणखी आहेत...