आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिस वर्ल्‍ड मानुषीचे भारतात आगमन, मुंबई एअरपोर्टवर जोरदार स्‍वागत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चीनमध्‍ये मिस वर्ल्‍डचा किताब जिंकणारी मानुषी छिल्‍लर शनिवारी रात्री भारतात परतली. यावेळी मुंबई एअरपोर्टवर तिचे जोरदार स्‍वागत करण्‍यात आले. मानुषीनेही हात दाखवून चाहत्‍यांच्‍या अभिवादनाचा स्‍वीकार केला.  तब्‍बल 17 वर्षांनंतर 20 वर्षीय मानुषीने भारतासाठी हा किताब जिंकला आहे.

 

हे उत्‍तर देऊन पटकावला होता किताब
मिस वर्ल्‍ड स्पर्धेत जगभरातील १८ सौंदर्यवतींना मागे टाकून मानुषीने हे यश मिळवले. ज्युरींनी अंतिम फेरीत तिला कोणत्या प्रोफेशनमध्ये सर्वाधिक सॅलरी द्यायला हवी आणि का? असा प्रश्‍न विचारला होता. यावर मानुषीने उत्‍तर दिले होते की, 'आईला सर्वात जास्त सॅलरी मिळायला हवी. आईला कॅश सॅलरी देऊन भागणार नाही, तिचा गौरव व्हावा. तिला भरपूर प्रेम मिळायला हवे.'


शास्त्रीय नृत्यात पारंगत
- मानुषीला पॅराग्लायडिंग, बंजी जंपिंग आणि स्कुबा डायव्हिंग आवडते.
- तिने शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले आहे.
- भारतातून प्रियंका चाेप्रा व्यतिरिक्त १९६६ मध्ये रिता फारिया, १९९४ मध्ये ऐश्वर्या राय, १९९७ मध्ये डायना हेडन आणि १९९९ मध्ये युक्ता मुखी मिस वर्ल्ड झाली हाेती.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ आणि फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...