आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Missing 3 Student Found Dead In River Near School At Virar

दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या 3 विद्यार्थ्यांचे मृतदेह विरारमध्ये आढळले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- शाळेजवळील याच नदीत मुलांचे मृतदेह आढळून आले)
मुंबई- मुंबईतील विरार परिसरातील वागड गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता 9 वी शिकणा-या तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह आज सकाळी नदीपात्रात आढळून आले. शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहणारी ही तीनही मुले सोमवारपासून बेपत्ता होती. मात्र, आज त्यांचे मृतदेह नदीत आढळून आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरारमध्ये वागड गुरुकुल ही शाळा आहे. येथे मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. सोमवारपासून ही तीन मुले अचानक बेपत्ता झाली होती. गेल्या दोन दिवसापासून त्यांची शोधाशोध सुरू होती. याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र, काहीच तपास लागत नव्हता. आज मात्र शाळेजवळच असलेल्या नदीपात्रात या तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. याची माहिती मिळताच पोलिसांसह शाळा व्यवस्थापन तेथे हजर झाले. तसेच त्यांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले.
दरम्यान, या मुलांचा नदीत पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे. या मुलांना पोहता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तसा अंदाज व्यक्त केला आहे. तरीही मुलांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.