आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्त्रींना हटवणे तत्त्वत: चुकीचेच; खासदार सुप्रिया सुळेंनी केला आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांना पदावरून हटवणे तत्त्वत: चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

टाटांची कंपनी सार्वजनिक नोंदणीकृत असून प्रत्येक निर्णय पारदर्शकपणे घेतले जातात; पण मिस्त्री यांचे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आले. सन्मानजनक पद्धतीने वागणूक देऊन यावर निर्णय अपेक्षित होता. पण तसे झाले नाही. अचानक पद्धतीने सर्व घडामोडी झाल्याने याचा कंपनीच्या नावावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्या म्हणाल्या. सुळे या सायरस मिस्त्री आणि त्यांची पत्नी रोहिगा यांच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहेत. एक राजकीय व्यक्ती म्हणून सुळे यांनी त्यांचे मत मांडल्यामुळे प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

टाटा ग्रुपला दिला मोठा दणका
टाटा ग्रुपला दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले असून लुटीयन झोनमधील पंचतारांकित हॉटेल ताज मानसिंहचा लिलाव रोखण्यास स्पष्ट नकार दर्शवला. टाटाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (आयएचसीएल) दाखल केलेले अपील रद्द करत नवी दिल्ली नगर पालिका परिषदेला (एनडीएमसी) लिलावाची मंजुरी दिली.
बातम्या आणखी आहेत...