आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्तीच्या यादीत मंत्री अन् अधिकाऱ्यांच्या मुलांचीच वर्णी; बडोलेंच्या मुलीचाही नंबर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेचा सरकारी पातळीवरच कसा गैरफायदा घेतला जात आहे याचे उदाहरण सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या रुपाने समोर आले. बडोले यांची मुलगी श्रुती हिला अमेरिकेच्या मँचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रॉफिजिक्समध्ये पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती घोषित करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि उच्च तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव यांच्या मुलांनाही ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बडाेलेंकडे स्पष्टीकरण मागितले.  

सामाजिक न्याय विभागाने ४ सप्टेंबर रोजी शासनादेश काढून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यास पात्र ठरलेल्या ३५ विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली. यात बडोले यांच्या मुलीसह सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि उच्च तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव दयानंद मेश्राम यांच्या मुलांचा समावेश आहे. अंतरिक्ष दिनेश वाघमारे याला अमेरिकेत दोन वर्षांच्याउर्वरित. ‘मास्टर इन सायन्स इन इन्फॉर्मेशन सिस्टिम’ अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळाली. तर समीर मेश्राम याला यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये “मास्टर ऑफ सायन्स इन मेकॅनिकल इंजीनियरिंग’साठी शिष्यवृत्ती मिळाली आहे. 

असा घेतला लाभ
शासनाच्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न ६ लाखाच्या आत आवश्यक आहे. परंतु ज्या यूनिव्हर्सिटीचे जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये स्थान आहे, तसेच लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची ही मर्यादा लागू नाही. याच अटीचा लाभ घेत बडोले आणि सचिव व उपसचिवांनी मुलांना शिष्यवृत्ती मिळवून दिली.

शिष्यवृत्तीसाठी नियम काय?
विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाताली महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तो पूर्ण वेळ विद्यार्थी असावा तसेच वर्ल्ड रँकिंगमध्ये ३०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था विद्यापीठात प्रवेश मिळालेला असावा. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त नसावे. ज्या यूनिव्हर्सिटीचे जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये स्थान आहे तेथे प्रवेश मिळाल्यास तसेच लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची मर्यादा लागू नाही.विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला नोकरी मिळेल तेव्हा किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यापासून दोन वर्षानंतर शासनाने त्याच्यावर जेवढा खर्च केला आहे त्याच्या १० टक्के रक्कम महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय निधीमध्ये जमा करावी लागेल.

दाेघांचीही निवड गुणवत्तेच्या अाधारेच : श्रृती बडोले आणि अंतरिक्ष वाघमारेंच्या निवडीसाठी नियमात कुठलेही बदल नाही. त्यांची निवड पूर्णत: गुणवत्तेनुसारच केल्याचा खुलासा राज्य सरकारने केला अाहे.  भारतात क्यूएस मानांकनाच्या पहिल्या २०० विद्यापीठांपैकी एकही नाही. त्यामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या जागतिक मानांकनाच्या पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत असेल तर उत्पन्नाच्या मर्यादेचा विचार न करता, त्यांना प्राधान्य देण्यात येते. १०१ ते ३०० या रँकिंगच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला असेल तर शिष्यवृत्तीसाठी ६ लाख रूपये उत्पन्न मर्यादा आहे. त्यामुळे त्याही निकषात हे दोन्ही विद्यार्थी बसतात. अर्ज करणाऱ्यांच्या यादीत त्यांची नावे असल्याने निवड समितीत आपण राहणार नाही,अशीच भूमिका बडाेले व  संबंधित सचिवांनी घेतली. त्यामुळे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेतील समितीने ही निवड केली, असे स्पष्टीकरण बडोले यांनीही दिले आहे.  

...अशी असते शिष्यवृत्ती !
संपूर्ण शिक्षणाची फी. विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इकॉनॉमी क्लासच्या विमान प्रवासाचे भाडे. परदेशात असताना शैक्षणिक खर्चासोबतच स्थानिक भेट आणि इतर अभ्यास सहलीसाठी दरवर्षी अमेरिका व अन्य देशांसाठी १५०० अमेरिकन डॉलर तर यूकेसाठी ११०० पाउंड इतका निर्वाह भत्ता दिला जातो.

वेतन किती? 
गेल्या वर्षी आमदारांचे वेतन सचिवांच्या वेतनाएवढे केल्याने वेतनाची रक्कम दीड ते दोन लाखांपर्यंत गेलेली आहे. आमदारांचे वेतन ७५ हजारांवरून दीड लाख रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच वर्षाला साधारणतः २० ते २२ लाख रुपये वेतनाच्या रुपात मिळतात. पीएचा पगार, टेलिफोन बिल वेगळे मिळते त्यामुळे तो भारही त्यांच्यावर नसतो.
 
परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी
- बडोलेंच्या कन्येची ऍस्ट्रॉनॉमी डॉक्टरेट अभ्यासासाठी निवड़​
- राजकुमार बडोले यांचे पाल्य परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी
- सचीन वाघमारे यांचे पाल्य परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचे लाभार्थी
- मॅचेस्टर युनिव्हर्सिटीत बडोलेंची कन्या श्रृतीची निवड
- सचिन वाघमारेंच्या मुलाची मास्टर अभ्यासक्रमासाठी निवड
- वाघमारेंचा मुलगा अंतरिक्षची अमेरिकेत मास्टर अभ्यासक्रमासाठी निवड
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि आणखी माहिती
बातम्या आणखी आहेत...