आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mix Response In State In Case Of School Shut Down

‘शाळा बंद’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संचमान्यता आणि अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर शिक्षक संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. इंग्रजी माध्यमांच्या, तसेच विनाअनुदानित स्थानिक प्रशासनाच्या शाळांना बंदमधून वगळण्यात आले होते. अनुदानित खासगी ९० टक्के शाळा शुक्रवारी बंद राहिल्याचा दावा शिक्षक भारती संघटनेने केला.

संचमान्यतेमुळे राज्यात अतिरिक्त ठरलेल्या हजारो शिक्षकांचा प्रश्न सरकारने तातडीने सोडवावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समिती, शिक्षक भारती आणि शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी संघटना संयुक्त आघाडी या संघटनांनी शुक्रवारी आंदोलन पुकारले होते. संचमान्यता आणि अतिरिक्त ठरणा-या शिक्षकांचे जीआर सरकारने रद्द करावेत
यासाठी शिक्षक आमदारांनी विधानसभेपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत कैफियत मांडली. मात्र, त्यांना कुठेही न्याय मिळाला नसल्याने त्यांनी शाळा बंद आंदोलन करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षकांना आत्महत्या करण्यास भाग पाडणा-या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर ३०५ कलमान्वये गुन्हा दाखल
करण्याची मागणी केली.

शिक्षणमंत्र्यांना जाग
विनोद तावडे यांनी गुरुवारी रात्री उशिरा अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर १६ डिसेंबरला निर्णय घेणार असल्याचे नागपुरात जाहीर केले. त्यामुळे राज्यातील ४५ हजार शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा जीआर रद्द होण्याची शिक्षक संघटनांना अजूनही आशा आहे.