आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MLA Anil Parab Tried Hard For Shivsena's Victory

आ.अनिल परब सेनेच्या विजयाचे शिल्पकार, तर चव्हाणांची पराभवावर मलमपट्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या वांद्रे पाेटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते शिवसेना अामदार अनिल परब. या मतदारसंघातील प्रत्येक कॉलनी, बूथ अाणि घराघरांपर्यंत यंत्रणा राबवून त्यांनी ही सर्व मते पक्षाच्या पारड्यात वळविण्यात ते यशस्वी ठरले.

विजयानंतर बाेलताना परब म्हणाले, ‘‘बाळासाहेबांना धोका दिल्यावर राणेंचा विजय कसा होईल? राणेंना अजूनही शिवसेना कळालेली नाही. शिवसेना संपली अस ते वारंवार म्हणत होते, मात्र शिवसैनिकांनी त्यांना जागा दाखवली. या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडणार याचा अंदाज होता. त्यामुळे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणे हे आमचं ध्येय होतं. त्या दृष्टीने सर्वांनी काम केले अन‌् त्याचेच फळ मिळाले. आमचे प्रतिस्पर्धी दोघेही होते. त्यांनाच टार्गेट करून आम्ही लढलो. पण दोघांची मते एकत्र केली, तरीही शिवसेनेची मतं जास्त आहेत,’ असे परब अानंदाने म्हणाले.
एखाद्या पराभवाने खचणार नाही, राणेंनी लढत दिली!, अशोक चव्हाणांची मलमपट्टी
जय पराजय हा निवडणुकीचा एक भाग असतो. वांद्र्यात काँग्रेस पराभूत झाली असली तरी ती खचणार नाही. याउलट केंद्र व राज्यात भाजप व शिवसेनेने जनतेची जी काही फसवणूक केली आहे, त्याविरोधातील लढा तीव्र करू. अतिशय प्रतिकूल परिस्थती असतानाही नारायण राणे यांनी चांगली लढत दिली. मागील निवडणुकीपेक्षा काँग्रेसच्या मतांमध्ये २१ हजारांनी वाढ झाली आहे, अशी मलमपट्टी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. राणे पराभूत झाले असले तरी ही काही त्यांची शेवटची निवडणूक नाही. ते आक्रमक नेते असून पुन्हा नव्या जोमाने ते काँग्रेसच्या प्रचार-प्रसारासाठी उभे राहतील. आम्ही त्यांना एकाकी पाडणार नाही. मी त्यांची भेट घेऊन पक्षांसाठी त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करेन. आमच्यात काहीएक मतभेद नाहीत, असेही चव्हाण म्हणाले.