आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माचा मुखवटा घालून नितेश राणेंचा CM ना \'बाबाजी का ठुल्लू\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऑफिसचे बांधकाम नियमित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याने पाच लाखांची लाच मागितल्याचा आरोप करुन कॉमेडीकिंग कपिल शर्माने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ट्विट करुन खळबळ उडवून दिली आहे. या ट्विटची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार किरीट सोमय्या, आमदार राम कदम यांनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणावर कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मात्र तिरकस टिपण्णी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कपिल शर्माचा मुखवटा घालून नितेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात नितेश सांगतात, की कपिल शर्माच्या ट्विटची लगेच दखल घेतली जाते. मी अनेक वर्षांपासून हा मुद्दा उचलतोय. त्याकडे लक्ष दिले जात नाही. याचा मला संताप आलाय.
नितेश सांगतात, की मी एक मुंबईकर, आज सकाळीच आईकलं, की असा चेहरा असलेल्या माणसाचा प्रश्न तुम्ही लगेच सोडवलात. मीही मुंबई महानगरपालिकेत होणारा भ्रष्टाचार... खड्ड्यांवर पडलेले रस्ते... नालेसफाई... पाणी चोरी आणि अशा असंख्या प्रश्नांबद्दल आपल्याला पत्र लिहिलेली आहेत.... निवेदनं दिलेली आहेत. मुंबई महानगरपालिकेत फेरफटका मारत असतो. पण आजपर्यंत माझं कोणीही ऐकलेलं नाही... आज आमच्यावर हम भी कपिल शर्मा असं बोलण्याची वेळ आलेली आहे. आता तरी आमचा प्रश्न सीएमसाहेब तुम्ही ऐकाल ना! मी एक मुंबईकर
पुढील स्लाईडवर क्लिक करुन ऐका ट्विटवर काय म्हणाले नितेश राणे.....
बातम्या आणखी आहेत...