आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या ओपन जिम शेजारीच लावला स्वाभिमान वडा व कोंबडी वडे स्टॉल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या वतीने ‘स्वाभिमान वडा आणि कोंबडी वडे’ स्टॉल लावला आहे. - Divya Marathi
आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या वतीने ‘स्वाभिमान वडा आणि कोंबडी वडे’ स्टॉल लावला आहे.
मुंबई- पदपथावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण चालणार नाही. पदपथ हे नागरिकांसाठी चालण्यास खुले केले पाहिजे, असे सांगणा-या आयुक्तांनीच या जिमला परवानगी दिल्याचे समजताच आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या वतीने ‘स्वाभिमान वडा आणि कोंबडी वडे’ स्टॉल लावला आहे.

मुंबई महापालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेले फिटनेस सेंटर (ओपन जिम) अनधिकृत असल्यामुळे महापालिकेने ते काढून टाकले आणि पुन्हा आयुक्तांच्या निर्देशानुसार त्याच जागी बसवले. आता याच अनधिकृत ठरवलेल्या ओपन जिमला महापालिका आयुक्तांनी स्वअधिकारात 3 महिन्यांकरता प्रायोगिक तत्त्वावर परवानगी दिली आहे. त्यामुळे अनधिकृत असलेली जिम अधिकृत करून घेण्यास सत्ताधारी शिवसेनेला यश आले. आता नितेश राणेंनीही आमच्या स्टॉलला 3 महिन्यांकरिता परवानगी द्यावी असे सांगत मुंबई पालिका प्रशासनाला कोंडीत पकडले आहे. दरम्यान, या मुद्यांवरून नितेश राणे आणि शिवसेना यांच्यात चांगलीच वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
सोमवारी मध्यरात्री हा स्टॉल मरीन ड्राईव्ह येथे लावण्यात आला. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांनी हा स्टॉल ताब्यात घेत तिथून हटवला. हा स्टॉल लावण्याचा प्रयत्न करणारे स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी सत्पाल वाबळे, संतोष कुबल, मनोज सोलंकी, हर्षद पाटील, मंगला मयेकर आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले. आता पुन्हा एकदा स्वाभिमानीने वडा स्टॉल लावला आहे.
पुढे आणखी वाचा व पाहा....