आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार ओमराजे निंबाळकर यांचे वर्षभर निलंबन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड उचलल्याबद्दल उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर मंगळवारी वर्षभरासाठी निलंबनाची कारवाई करण्‍यात आली. शहराच्या पाणीपुरवठ्यासंबंधी समाधान न झाल्याने ओमराजे यांनी गोंधळ केला होता. निंबाळकर यांनी पाण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर 15 दिवसांत पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले. परंतु उत्तरावर समाधान न झाल्याने ओमराजेंनी अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेत राजदंड उचलला. 22 एप्रिलपर्यंत शहराला पाणी सोडण्याचा प्रयत्न केला जाईल, यासाठी मुख्यमंत्र्यांनी 51 कोटी मंजूर केले असून 25 कोटी दिले आहेत, असे पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी सांगितले.