आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाेदवीर गाेत्यात, लाचखाेरीची तक्रार करणाऱ्या कपिल शर्माला सर्वांनीच घेरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अापल्या कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकाम परवानगीसाठी पाच लाखांची लाच मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी मागितल्याची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी टि्वटद्वारे करणारा काॅमेडियन कपिल शर्मा चांगलाच अडचणीत अाला अाहे. ‘लाचखाेर अधिकाऱ्याचे नाव जाहीर करा,’ अशी मागणी करत भाजप अामदार राम कदम यांनी साेमवारी त्याच्याविराेधात माेर्चा काढला, तर लाचखाेरांची नावे लपवून ठेवल्याबद्दल मनसेनेही शर्माविराेधात पाेलिसांत तक्रार दाखल केली अाहे.

दरम्यान, ज्या कार्यालयाच्या बांधकामासाठी कपिलने परवानगी मागितली हाेती तेच बेकायदा जागेवर उभारले जात असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला अाहे. त्यामुळे अाणखीनच अडचणीत अालेल्या कपिलने सध्या ‘माैन’ साधणेच पसंत केलेले अाहे.

कपिलने तक्रार दाखल केल्यानंतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापालिका प्रशासनानेही त्याला लाचखाेराचे नाव जाहीर करण्याचे अाव्हान दिले हाेते, मात्र त्यावरही कपिल माैन बाळगून अाहेत. या पार्श्वभूमीवर अामदार राम कदम व भाजपच्या कार्यकर्त्यांनी कपिल यांच्या निवासस्थानावर माेर्चा काढला. ‘भ्रष्टाचाराविरोधात आम्ही कपिल शर्मासोबत आहोत, कपिलने केलेले अाराेप गंभीर अाहेत. आता पैसे मागणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱ्यांची नावेही जाहीर करावीत. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे जाहीर न करण्यासाठी त्यांच्यावर काेणाचा दबाव अाहे का?’ असा प्रश्न कदम यांनी उपस्थित केला. कपिलला भेटण्यासाठी ते त्याच्या घरीही जाणार होते. पण पोलिसांनी त्यांना रोखले. शेवटी कपिलच्या घराबाहेरच त्यांनी अांदाेलन केले. तसेच या प्रकरणी कदम यांनी पाेलिसातही तक्रार नाेंदवली अाहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, भ्रष्ट लाेकांना पाठीशी घालताेय कपिल : मनसे
बातम्या आणखी आहेत...