आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे मंत्री पक्षाच्याच लोकांची कामे करत नाहीत, चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचेमंत्री आपल्याच पक्षातील आमदारांची कामे करत नाहीत. त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांकडे जावे लागले. मुख्यमंत्री खूप चांगले काम करतात. परंतु मी त्यांच्याकडे गेलो म्हणून शिवसेना सोडणार आहे, असे नाही. मी कट्टर शिवसैनिक आहे आणि शिवसेनेतच राहणार असल्याचे चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी स्पष्ट केले. एकीकडे एक आमदार नाराजी व्यक्त करत असताना दुसरीकडे परभणीचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यात दिलजमाई करण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करावे लागले. 

गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुकाराम काते यांच्याकडे गणपती दर्शनाला गेल्यानंतर काते भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा बातम्या येऊ लागल्या होत्या. त्याबाबत बोलताना काते म्हणाले, शिवसेनेचे मंत्री काम करत नसल्याबद्दल मी नाराजी व्यक्त केली होती आणि आजही नाराजी व्यक्त करत आहे. मुंबई महापालिकेत सत्ता असतानाही आमच्या मतदारसंघातील कामे होत नाहीत. महापालिकेच्या कामगार वसाहतीच्या समस्या सोडवल्या जात नाहीत. त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे. या कामगारांना घरातून बाहेर काढले तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देईन, असेही काते यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, काते यांनी केलेल्या आरोपाबाबत सध्या तरी शिवसेनेकडून कोणत्याही नेत्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. 
बातम्या आणखी आहेत...