आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मातोश्री’च्या फॉर्मबाजीने आमदारांमध्ये अस्वस्थता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक बंदी करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर शिवसेना गंभीर असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाने पक्षाच्या सर्व आमदारांना त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत याची माहिती मागवणारे छापील फॉर्म दिले आहेत. प्रत्येक आमदाराने लवकरात लवकर ही माहिती द्यायची आहे. यामुळे आमदारांमध्ये मात्र अस्वस्थता आहे.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सदस्यांकडून पुढील माहिती मागवल्याचे फॉर्मवर सुरुवातीलाच नमूद आहे. त्यापुढे सदस्यांवर किती गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत? आणि गुन्ह्यांचे स्वरूप काय आहे? असा प्रश्न आहे. सोबत एक तक्ता असून, त्यात 1) अ. क्र., 2)वर्ष, 3) आयपीसी कलम, 4)गुन्ह्यांचे स्वरूप आंदोलनात्मक आहे काय, उदा. मोर्चा, बंद, दंगल इं., 5)गुन्ह्यांचे स्वरूप गुन्हेगारी, वैयक्तिक प्रकारचे आहे काय, अशी माहिती विचारण्यात आली आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने दै. ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली आहे. शिवसेनेच्या राजकारणाचा बाज पाहता पक्षात गुन्हा दाखल नसलेला आमदार सापडणे कठीण आहे. त्यामुळे गुन्हा दाखल असल्यास पुढील निवडणुकीत पुढील निवडणुकीत उमेदवारी मिळण्यावर परिणाम होणार किंवा काय याबाबत आमदारांमध्ये चर्चा सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयावर संसदेत सुधारणा विधेयक आणण्यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे काहीतरी तोडगा निघू शकतो. मात्र त्याआधीच घाईघाईने असे फॉर्म आमदारांकडून भरून घेण्यामागे नक्की काय हेतू आहे, असे शिवसेनेच्या आमदारांचे म्हणणे आहे. मुंबईच्या उपनगरातील एका आमदाराच्या म्हणण्यानुसार पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याला काही आमदारांच्या कण्या कापायच्या आहेत. त्यामुळे त्यांच्याच डोक्यातून ही कल्पना आली आहे. तथापि, काही आमदारांच्या मते मात्र ही रूटीन प्रोसेस असून, यात नवे काहीही नाही.