आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार महादेव जानकर यांना \'सातारा रत्न\' पुरस्कार जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान'च्या वतीने देण्यात येणारा 'सातारा रत्न' हा पुरस्कार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व आमदार महादेव जानकर यांना जाहीर झाला आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे येथील सातारावासीयांचा मेळावा 21 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता परळ येथील दामोदर हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
आमदार महादेव जानकर यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचा सातारा वासियांकडून यानिमित्ताने सन्मान केला जात आहे. जानकर हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील रहिवासी असून त्यांच्या मातोश्री अजून तेथे राहतात. अभियंता असलेल्या जानकरांनी समाजाच्या उत्थानाची शपथ घेवून अविवाहित राहून, संसारापासून लांब राहून, घरदार न करता राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. या पक्षाचे हे तपपूर्ती वर्ष आहे. राज्यातील सत्ता परिवर्तनात त्यांच्या पक्षाचा महत्वाचा वाटा आहे.
मागील वर्षी हा पुरस्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आला होता.