आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्ट्र: शरद पवार 15 ऑगस्टपासून मराठवाड्याच्या दौ-यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विधान परिषदेतील आमदार निरंजन डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. - Divya Marathi
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विधान परिषदेतील आमदार निरंजन डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री शरद पवार हे येत्या 15 ऑगस्टपासून मराठवाड्याच्या दौ-यावर जाणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार निरंजन डावखरे यांची नियुक्ती केल्याचेही त्यांनी जाहीर केले. विद्यमान अध्यक्ष उमेश पाटील यांची ते जागा घेतील.
राज्यात गुरुवारी 7 हजारांहून अधिक ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. या निकालात राष्ट्रवादीने चांगले यश मिळवले आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या निकालाबाबत समाधान व्यक्त केले. राज्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले असून, बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचे वर्चस्व राखल्याचे तटकरेंनी सांगितले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मराठवाड्याच्या दौ-यावर 15 ऑगस्टपासून जात आहेत. माझ्यासह पक्षाचे नेते 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागात फिरून दुष्काळ व पावसाच्या स्थितीबाबत माहिती घेणार आहोत, असेही तटकरेंनी सांगितले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत काँग्रेससोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे. मात्र, याबाबत काँग्रेसलाच निर्णय घ्यायचा आहे. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून यावर मार्ग काढतील असा विश्वासही तटकरेंनी व्यक्त केला.
पुढे वाचा, महाराष्ट्रातील आजच्या ताज्या घडामोडी....
बातम्या आणखी आहेत...