आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारकांच्या \'त्या\' वक्तव्याबाबत सर्वपक्षीय समिती घेणार निर्णय, निलंबन मात्र अटळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधान परिषदेत बुधवारी आमदार प्रशांत परिचारक यांनी लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून प्रचंड गोंधळ झाला. आमदार परिचारक यांच्या बडतर्फीची मागणी करत विरोधक आक्रमक झाले. दरम्यान, यावर निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांच्यावर सभागृहातून निलंबनाची कारवाई हाेण्याची शक्यता आहे.
 
दुसरीकडे विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. विशेष म्हणजे सत्ताधारी शिवसेना आमदारांनीही यात विरोधकांना साथ दिली. दोन्ही सभागृहांत गोंधळामुळे कामकाज तहकूब करावे लागले.

परिचारकांबद्दल सरकारने भूमिका स्पष्ट करावी : तटकरे
बुधवारी विधान परिषदेत कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी परिचारक यांच्याबद्दल सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असा आग्रह धरला. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कर्जमाफीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीला शिवसेनेचीही साथ...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...