आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MMRC MD Ashwini Bhide Briefs The Media On Metro 3 Project

मुंबई \'मेट्रो-3\' ठरणार वैभव: 35 टक्के ट्राफिक होणार कमी, रोज 2.5 लाख लिटर पेट्रोल वाचणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील आणखी एक महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा भुयारी 'मेट्रो-3'चे काम वेळेत म्हणजेच 2020 पर्यंत पूर्ण होईल. कुलाबा-बांद्रा-सिप्झ हा 33.5 किमी लांबीची भुयारी मेट्रो-3 सुरु झाल्यानंतर मुंबईतील 35 टक्के ट्राफिक कमी होईल. आताच्या अंदाजानुसार, 2022 मध्ये मुंबईतील या मार्गावरील पट्ट्यात एकून 4 लाख 56 हजार 771 वाहने कमी धावतील. तसेच यामुळे रोजचे 2 लाख 43 हजार 390 लिटर पेट्रोल-डिझेलचा वापर कमी होईल, असेही भिडे यांनी सांगितले.
कुलाबा ते सिप्झ असा मेट्रो-3 हा 33.5 किलोमीटर लांबीचा मार्ग असून यावर 27 मेट्रो स्टेशन्स असतील. कुलाबा ते सिप्झ हे अंतर या भुयारी मेट्रोने केवळ 50 मिनिटांत पार करता येईल. दरम्यान, गिरगाव आणि काळबादेवीतील सुमारे 26 चाळी यामुळे जमीनदोस्त होणार आहेत. तसेच या प्रकल्पासाठी एकूण 2614 बांधकामे हटवावी लागणार असल्याचे एमएमआरडीएच्या आयुक्त अश्‍विनी भिडे यांनी म्हटले आहे.
मेट्रो-3 चा मार्ग नेमका कसा असेल आणि नेमक्या किती बांधकामे पाडली जातील याची माहिती देण्यासाठी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही माहिती दिली आहे.
भिडे म्हणाल्या, मेट्रो-3 या मार्गावर एकून 2614 बांधकामे पाडावी लागणार आहेत. यात झोपडपट्ट्या, इमारती, दुकाने, सरकारी व राजकीय कार्यालये या बांधकामांचा समावेश आहे. यातील काही बांधकामे तात्पुरती तर काही कायमस्वरूपी हटविली जातील. झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन एसआरए इमारतीत, तर चाळींतील रहिवाशांचे म्हाडा इमारतींत पुनर्वसन करण्यात येणार आहे. गिरगाव भागातील 18 इमारतींवर तर काळबादेवी परिसरातील 8 इमारतीवर बुलडोझर फिरवावा लागणार आहे. मेट्रो-3 चे काम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरु व होईल ते 2020 मध्ये संपेल असेही त्यांनी सांगितले.
पुढे वाचा, भुयारी मेट्रो सुरु होताच 35 टक्के वाहतुकीवरील भोजा होणार कमी, मुंबईकरांचे वाचेल रोज अडीच लाख लिटर पेट्रोल- डिझेल...