आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mms Shooted In Hotel's Toilet At Mumbai, Women Compalints Againest Cleaner Boy

मुंबईतील पॉश हॉटेलात महिलांचे अश्लिल MMS बनविल्याचा प्रकार उघडकीस!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील अंधेरी भागातील शिशा स्काय लाऊन्ज या अलिशान हॉटेलमध्ये महिलांचे अश्लील एमएमएस बनवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. टॉयलेटमधील सफाई कर्मचा-याने हा प्रताप केला असून, एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित सफाई कर्मचा-याला ताब्यात घेतले आहे.
संबंधित सफाई कर्मचा-याने महिलांचे अश्लिल एमएमएस बनवण्यासाठी महिलांच्या टॉयलेट आणि बाथरुमचा वापर केल्याचे समोर येत आहे. बाथरूममध्ये मोबाईल लपवून ठेवण्यात आला होता. तसेच त्याचे रिकॉर्डिंग सुरु होते. बाथरूममधील बेसिनच्या खाली मोबाईल ठेवल्याचे एका महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे संबंधित महिलेने त्या बाथरूमवर पाळत ठेवली. ती महिला बाथरूममधून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांतच सफाई कर्मचारी साफसफाईच्या नावाखाली तेथे गेला. त्याने तो मोबाईल ताब्यात घेऊन पुन्हा बाहेर आला. संबंधित महिलेने पुन्हा बाथरूममध्ये पाहिले असता तो कामगार मोबाईल घेऊन गेला होता. त्यानंतर संबंधित महिलेने हॉटेलच्या व्यवस्थापकाकडे चौकशी केली. तसेच सफाई कामगाराला बोलवून त्याच्याकडील मोबाईल हस्तगत केला. त्यावेळी त्याने अनेकांचे अश्लिल एमएमएस क्लिप बनविल्याचे आढळून आले.

अंधेरीतील हे अलिशान हॉटेल असून, यात पबची उत्तम सोय असल्याने अनेक कपल्स येथे येत असतात. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाचा एकच गोंधळ उडाला. आता या प्रकरणी तरूणाला ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेमुळे हॉटेलच्या टॉयलेटमधील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.