आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNC Election Declared In Jalgaon And Other Places

जळगाव मनपासाठी 1 सप्टेंबरला मतदान, 2 ला मतमोजणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच ठाणे, भिवंडी -निजामपूर आणि अमरावती महापालिकेतील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्याच्या मुख्य निवडणुक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सोमवारी जाहीर केला.

सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपंचायत, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेच्या सार्वत्रिक व दारव्हा नगर परिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राच्या तसेच धर्माबाद, उमरी, उस्मानाबाद व रिसोड या नगर परिषदांमधील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही या वेळी जाहीर करण्यात आला. या निवडणुकीकरिता 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. 8 ऑगस्ट रोजी छाननी होईल. 20 ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. 1 सप्टेंबर रोजी मतदान तर 2 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.

हिंगोली जिल्हा परिषदेमधील 44 करजाळा तसेच बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समिती (22 जवळा, ब) नांदेड जिल्ह्यातील किनवट पंचायत समिती (9 चिखली, ब) व नागपूर जिल्ह्यातील सावनेर पंचायत समिती (31 वलनी) या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयुक्तांनी आज जाहीर केला. या ठिकाणी 13 ते 17 ऑगस्ट या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 19 ऑगस्ट रोजी छाननी होईल. 1 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. सार्वत्रिक निवडणुका असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व क्षेत्रात तर पोटनिवडणुका असलेल्या ठिकाणी संबंधित प्रभागामध्ये आचारसंहिता लागू झाली.