आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस कार्यालय तोडफोडप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना न्यायालयीन काेठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आझाद मैदान येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह इतर सात मनसे कार्यकर्त्यांची अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच या सर्वांच्या जामीन अर्जावर  बुधवारी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत या सर्वांची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.     


काँग्रेस कार्यालयाची गेल्या आठवड्यात तोडफोड करण्यात आली होती.  मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह माजी नगरसेवक संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरीश सोलंकी आणि दिवाकर पडवळ या सात कार्यकर्त्यांना अटक केली. त्यांच्यावर दंगल घडवणे, विनापरवानगी एखाद्याच्या खासगी मालमत्तेत प्रवेश करणे, मालमत्तेचे नुकसान व नासधूस करणे यासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या पोलिस काेठडीत असलेल्या या आठही जणांना सोमवारी  १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 

पुढील स्‍लाइ्ड वर वाचा, या कार्यकर्तांना केली आहे अटक...

हेही वाचा, असे बरेच कुत्रे भुंकतात, हत्‍ती चालत राहतो; वारीस पठाण यांच्‍यावर मनसेचा पलटवार... 

बातम्या आणखी आहेत...