आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे कार्यकर्त्‍यांचा असाही भंपकपणा, आंदोलनात जाळण्‍यासाठी स्‍वतः विकत घेतली कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना आणि राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये दोन दिवसांपूर्वी संघर्षाची ठिणगी उडाली होती. त्‍यात मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांनी आंदोलन अधिक उग्र दिसावे यासाठी एक वेगळीच चाल खेळली. मुंबईत मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांनी एक कार जाळली होती. परंतु, ती कार मनसे कार्यकर्त्‍यांचीच होती आणि जाळण्‍यासाठीच ती विकत घेतली होती, अशी धक्‍कादायक माहिती हाती आली आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी मनसेच्‍या चार कार्यकर्त्‍यांना अटक केली आहे. त्‍यांनी कुर्ला परिसरात वृत्त वाहिन्‍यांच्‍या प्रतिनिधींसमोर एक मारुती 800 कार जाळली. ही कार जुनी होती. पोलिसांनी जाळपोळीची दखल घेऊन तपास केला. तेव्‍हा वेगळीच माहिती हाती आली. मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांनी एका सेकंड हँड कार विक्रेत्‍याकडून 35 हजार रुपयांमध्‍ये ती कार विकत घेतली. त्‍यानंतर कुर्ला परिसरात कार जाळली. मुस्‍ताकी अहमद शेख, अब्‍दुल हुसेन शेख, आसिफ अली मुर्तजा शेख आणि शानहान आसिफ अली तुर्की अशी या कार्यकर्त्‍यांची नावे आहेत. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे.