आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

MNS चे ठाण्यात खळ्ळ-खटॅक; परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनसेने पुन्हा एकदा खळ्ळ-खटॅक आंदोलन सुरु केले आहे. - Divya Marathi
मनसेने पुन्हा एकदा खळ्ळ-खटॅक आंदोलन सुरु केले आहे.

मुंबई- ठाण्यात कोलबाड येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण केली आहे. कोळी समाज आणि मराठी माणसालाच या ठिकाणी मासे विकण्याचा हक्क असल्याचे सांगत मनसेने हे आंदोलन केले आहे. मराठी भाषा आणि भूमिपुत्र या दोन मुद्द्यांवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

 

रेल्वे स्टेशनच्या आसपास 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसता येणार नाही, असा निकाल कोर्टाने दिल्यामुळे मनसेला नवे बळच मिळाले आहे. त्यानंतर, ठाण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी भूमिपुत्रांचा मुद्दा ठळकपणे मांडला होता. पदपथावर बसून व्यवसाय करण्याचा हक्क हा मराठी माणसाचाच असल्याचा दावा त्यांनी केला होता. तोच धागा पकडून, ठाण्यातील मनसैनिकांनी आज कोलबाड येथे परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण करत हाकलून लावले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

 

बातम्या आणखी आहेत...