आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - मुंबईतील बैल बाजार परिसरातील मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक संजय तुरडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर खातू यांच्यासह सात जणांना गुरुवारी २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पराभव झाल्याच्या रागात गुरुवारी रात्री उशिरा खातू यांनी तुरडे यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण केली होती.  
 

मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६६ मधून विजयी झाल्यानंतर मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक संजय तुरडे हे कालिना बैलबाजार परिसरातील आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेत असताना रात्री साडेदहाच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.
 
खातू आणि त्यांच्या समर्थकांनी लोखंडी सळ्यांनी तुरडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात तुरडे यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांपैकी सहा जणांना मारहाण करण्यात आली असून त्यापैकी तिघेजण राजावाडी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
 
दरम्यान, विनोबा भावे पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा खातू यांच्यासह सात जणांना अटक केली. शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता या सातही जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. सुधीर खातू हे अगोदर मनसेचे कार्यकर्ते होते. वर्षभरापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.
बातम्या आणखी आहेत...