आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेच्या ब्ल्यू प्रिंटला सापडला मुहूर्त, २५ सप्टेंबर रोजी आराखडा सादर करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेली सात वर्षे येणार-येणार म्हणून गाजत असलेली मनसेप्रमुख राज ठाकरे यांची राज्याच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट अखेर तयार झाली आहे. ब्ल्यू प्रिंट सादर करण्यास राज ठाकरे यांनी घटस्थापनेचा दिवस शोधला असून २५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यकर्त्यांच्या समोर ब्ल्यू प्रिंट सादर करणार असल्याची माहिती मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी दिली.

शिवसेना सोडून मनसे स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी राज्याच्या विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करणार असल्याचे सांिगतले. त्यानंतर ही ब्ल्यू प्रिंट तयार होतच होती. ब्ल्यू प्रिंट सादर करण्याच्या अनेक तारखा जाहीर झाल्या परंतु ब्ल्यू प्रिंट मात्र आली नाही. गेल्या वर्षी नागपूर येथे राज यांनी वर्षाच्या अखेरीस ब्ल्यू प्रिंट सादर करू, असे म्हटले होते. परंतु ती काही आली नाही. त्यानंतर २१ ऑगस्ट तारीख जाहीर झाली परंतु त्या दिवशीही ब्ल्यू प्रिंट आली नाही. नंतर १० सप्टेंबरची तारीख सांगण्यात आली. मनसेच्या ब्ल्यू प्रिंटआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र आपले व्हिजन डॉक्यूमेंट सादर करून
बाजी मारली. रविवारीही उद्धव ठाकरे व्हिजन डॉक्युमेंटचा पुढील टप्पा सादर करणार आहेत.
त्यामुळे सगळ्यांचे लक्ष १० सप्टेंबरकडे होते. कारण राज ठाकरे ब्ल्यू प्रिंट सादर करणार होते. परंतु शनिवारी राज यांनी स्वतःच ब्ल्यू प्रिंट १० सप्टेंबर रोजी नव्हे तर २५ सप्टेंबर रोजी सादर करणार असल्याचे सांिगतले. राज्याच्या विकासाची ही योजना असून अत्यंत गंभीरपणे प्रत्येक विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे. जनतेला ही ब्ल्यू प्रिंट पाहता यावी म्हणून त्याची वेबसाईटही तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आपल्या ब्ल्यूप्रिंटमध्ये काय मांडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
पितृपक्षामुळे लांबणीवर
मनसेतील सूत्रांनी िदलेल्या माहितीनुसार नऊ तारखेपासून पितृपक्ष सुरू होत असल्याने मनसे प्रमुखांनी घटस्थापनेचा म्हणजेच २५ सप्टेंबरचा दिवस निवडला आहे. १० सप्टेंबर रोजी ब्ल्यू प्रिंट सादर करणार, असे मनसे प्रमुखांनी म्हटलेच नव्हते. माध्यमांनीच अशा बातम्या दिल्या होत्या. ब्ल्यू प्रिंट मोठी असल्याने आणि ती सादर करताना चुका होऊ नयेत म्हणून त्याची रिहर्सल षण्मुखानंद हॉलमध्ये करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांिगतले.