आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खारेगाव टोलनाक्यावर महिलेसोबत उद्धट वर्तन, राज ठाकरेंच्या उपस्थितीत तोडफोड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील खारेगाव टोल नाक्यावर टोल भरण्यावरून एका महिलेसोबत तेथील कर्मचार्‍यांनी उद्धट वर्तन केले. यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी या टोल नाक्यावर तोडफोड केली. विशेष म्हणजे यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे स्वत: उपस्थित होते.

मिळालेल्या मा‍हितीनुसार, खारेगाव टोल नाक्यावर महिलेशी गैरवर्तन केल्याचे समजताज राज ठाकरे घटनास्थळी आले. त्यानंतर थोड्याच वेळात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले. त्यानंतर त्यांनी टोल नाक्यावर तोडफोड सुरु केली.
त्यांनतर टोलचालकांनी पोलिसांना याची माहिती दिली. तोडफोड झाल्याचे समजताच व खुद्द राज ठाकरे तेथे आल्याने घटनेची तीव्रता पाहून पोलिस लगेच दाखल झाले. त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. आता या टोलनाक्याला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.