आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी कपड्यांचे शाेरूम मनसेने फाेडले, पाकिस्तानी ब्रँडच्या कपड्यांना विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्वच निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर शांत झालेल्या मनसेने पुन्हा एकदा राजकीय अांदाेलनाच्या रपाने अाक्रमक पवित्रा घेतला अाहे. मुंबईतील लोअर परळ भागात असलेल्या फिनिक्स मॉलमधील ‘झारा’ नावाच्या कपड्याच्या दुकानाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी तोडफोड केली आहे.
 
पाकिस्तानी ब्रँडच्या कपड्यांची विक्री न करण्याबाबत वारंवार विनंती पत्र देऊनही विक्री सुरूच ठेवल्याने हे आंदोलन केल्याचा दावा मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.  दरम्यान, मुंबईतील डबेवाल्यांनीही मंगळवारी पाकिस्तानविराेधी निदर्शने करून कुलभूषण जाधव यांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली.  
 
‘राॅ’चे कथित अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या मुद्द्यावरून भारत- पाकिस्तान या शेजारी देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला अाहे. याच मुद्द्यावरून मनसे अाक्रमक झाली अाहे. गेल्या काही दिवसांपासून फिनिक्स मिलमधील पॅलेडियम मॉलमध्ये झारा ब्रँडच्या दुकानामध्ये पाकिस्तानी कपड्यांची विक्री होत असल्याची बाब मनसेच्या कार्यकर्त्यांना समजली होती. ही माहिती समजताच मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता, विभाग अध्यक्ष नगरसेवक दत्ता नरवणकर, भूपेन जोशी या कार्यकर्त्यांनी मंगळवारी या दुकानावर धडक देत दुकानाची तोडफोड करत मालाची नासधूस केली. 
 
कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात मनसे गेल्या आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागांत आंदोलनाच्या माध्यमातून पाकिस्तानचा निषेध करत आहे. तसेच यापूर्वीही चित्रपटसृष्टीतील पाकिस्तानी कलाकारांना काम न करू देण्याचे धोरण मनसेने अवलंबले आहे.  

यापुढेही वस्तूंची विक्री केल्यास तीव्र अांदाेलन  
रिटा गुप्ता म्हणाल्या की, मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी मालाडच्या इनॉर्बिट, कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमधील झाराच्या शोरूमला पत्राद्वारे पाकिस्तानी कपड्यांची विक्री न करण्याबाबत विनंती केली होती.
 
मात्र त्यानंतरही ‘झारा’च्या काही दुकानांमध्ये या कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती होती. त्यानुसार आम्ही हे आंदोलन केले. तसेच पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या वस्तू इतर कुणीही विकू नये, अन्यथा या पेक्षाही तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा धमकीवजा इशारा मनसेच्या वतीने मुंबईतील सर्व मॉल्स आणि डिपार्टमेंटल स्टोअर्सला देत असल्याचे त्या म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...