मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) कोपरखैरणे रेल्वेस्थानक परिसरात पॉप सिंगर मिका सिंग यांचा पुतळा व पाकिस्तानचा झेंडा जाळला. अमेरिकेत 'हमारा पाकिस्तान' या कार्यक्रमात मिका सिंग सहभाग घेणार आहे. याच्या निषेधार्थ मनसेने शनिवारी आंदोलन करून त्याचा निषेध केला आहे.
नवी मुंबई्त कोपरखैरणे रेल्वेस्थानक परिसरात गायक मिका सिंग याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. तसेच पाकिस्तानचा राष्ट्रध्वजही जाळला. मिकाच्या 'हमारा पाकिस्तान', या कथित वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनेही केली.
दरम्यान, मिका सिंग याने '15 ऑगस्ट को हमारा हिंदुस्थान आजाद हुआ और 14 ऑगस्ट को हमारा पाकिस्तान', असे ट्विट करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्याने 'हमारा पाकिस्तान' म्हटल्याने सगळीकडून त्याच्यावर टीका होत आहे. पाकिस्तानचे गोडवे गाणार्या मिका सिंग याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) यापूर्वी धमकीही दिली होती.
मिका सिंग 12 आणि 13 ऑगस्टला अमेरिकेत होणार्या कार्यक्रमात परफॉर्मन्स करणार आहे. या कार्यक्रमाचा आयोजक पाकिस्तानी आहे. 'मिकाला लाज कशी वाटत नाही? हमारा पाकिस्तान म्हणायला. आम्ही मिकाला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही. मिकाने मुंबईत परतून हातात माईक धरून दाखवावा, अशा शब्दात मनसे चित्रपट अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे. सोशल मीडियावर त्याच्याविरोध तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...