आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी पाट्यांसाठी MNS कडून 15 दिवसांची मुदत; अमराठी पाट्या असणाऱ्यांना इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील अनेक दुकानांच्या पाट्या अद्यापही अमराठीत असुन त्या त्वरीत मराठीत बदलण्यात याव्यात, अशी मागणी वजा इशाऱ्याचे निवेदन देण्याची मोहिम मनसेने सुरु केली आहे. अमराठी पाट्या बदलण्यासाठी 15 दिवसांची मुदतही मनसेने दिली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह दुकान निरीक्षकांनाही याबाबतचे निवेदन मनसेने दिले आहे.

 

मराठी राजभाषा

राज्यात मराठीला राजभाषेचा दर्जा आहे. अशातच व्यावसायिक आस्थापनांसह दुकानदारांनी आपापल्या कार्यालयासह दुकानांवरील दर्शनी भागात ठळकपणे मराठी भाषेत नाव लिहिणे अपेक्षित आहे. तरीदेखील अमराठी दुकानदारांनी व व्यावसायिकांनी आपापल्या कार्यालयांसह दुकांनावरील पाट्यांवरुन मराठी भाषेला बगल देत इंग्रजी भाषेतच आस्थापनांची नावे लिहिल्याचे निदर्शनास आले आहे. यापुर्वी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या अमराठी पाट्यांवर हल्लाबोल करुन मराठी भाषेत दुकानांच्या पाट्या लिहिण्यास व्यावसायिकांना भाग पाडले होते. यानंतरही मीरा-भार्इंदर मधील अनेक व्यावसायिकांनी दुकानांवर मराठी ऐवजी इंग्रजी भाषेत नाव लिहिल्याचे दिसुन येत असल्याने त्या अमराठी पाट्यांविरोधात पक्षाध्यक्षांच्या निर्देशानुसार आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतल्याचे मनसेने म्हटले आहे. 

 

आयुक्तांना निवदेन

शहरातील सर्व अमराठी पाट्या असलेल्या व्यावसायिकांना त्वरीत मराठी भाषेत पाट्या बदलण्याचे निवेदन देण्याची मोहिम मनसेने सुरु केली. या निवेदनाद्वारे त्या व्यावसायिकांना येत्या 15 दिवसांत अमराठी पाट्या मराठी भाषेत न बदलल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. तत्पुर्वी पालिकेच्या परवाना विभागानेही व्यावसायिक परवाना मिळविण्यासह त्याचे नुतनीकरण करण्यासाठी आलेल्या व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनेवरील दर्शनीभागात असलेल्या पाट्या मराठी भाषेतच लिहिण्याची सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी मनसेने पालिका आयुक्तांकडे निवदेनाद्वारे केली आहे. 

 

पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...