आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसैनिकांवर हल्ला: मार देणारे सैनिक हवेत, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना चिथावणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्यानंतर रात्री २ च्या सुमारास अमित ठाकरे यांनी ढोलम यांची भेट घेतली. - Divya Marathi
त्यानंतर रात्री २ च्या सुमारास अमित ठाकरे यांनी ढोलम यांची भेट घेतली.

मुंबई- फेरीवाल्यांकडून मनसे पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खूपच गंभीरतेने घेतले आहे. ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी सोमवारी झालेल्या मनसे विभागप्रमुखांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते.  “मला मार खाणारे कार्यकर्ते नकोत तर मारणारे कार्यकर्ते हवे’ असे राज ठाकरे यांनी सुनावल्याचे समजते. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मनसेची मोहीम आता अधिकच तीव्र केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. 

 
अनधिकृत फेरीवाल्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत. मागच्या महिन्यात मालाडमध्ये सुशांत माळवदे या मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला झाला होता. रविवारी मनसेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि उपेंद्र शेवाळे यांना फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली. मारहाणीत शेवाळे यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मध्यरात्री २ वाजता महात्मा फुले रुग्णालयात जाऊन ढोलम यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी मनसेच्या सर्व विभागप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांची ‘कृष्णकुंज’ येथे तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर परप्रांतीय फेरीवाल्यांकडून दिवसाढवळ्या होणाऱ्या हल्ल्यांमुळे पक्षात नाराजीची भावना आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची यामागे फूस असल्याचा मनसेचा आरोप आहे. निरुपम यांची शनिवारची सभा मनसे कार्यकर्त्यांनी उधळून लावली होती. निरुपम यांची पुढे कुठेही सभा होऊ न देण्याचा निर्धार मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे आता अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मनसेची मोहीम अधिक तीव्र होत जाणार आहे हे निश्चित. दरम्यान, सायंकाळी मनसे कार्यकर्त्यांनी कामठोड्यात फेरीवाल्यांना मारहाण करून त्यांच्या साहित्याची  मोडतोड केली. 

 

निरुपम यांचा इशारा

यापुढेही फेरीवाले आक्रमक होतील. काँग्रेसचा हिंसेवर विश्वास नाही; पण सरकार बघ्याची भूमिका घेत असतील तर फेरीवाल्यांसमोर दुसरा पर्याय नाही, असे ट्विट निरुपम यांनी केले.

 

तिघांना अटक

रविवारी मनसेच्या ४ कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एक काँग्रेसचा पदाधिकारी आहे. कालच्या घटनेमुळे विक्रोळीमध्ये तणाव आहे.

 

काय आहे विक्रोळी प्रकरण- 

विक्रोळी भागात रविवारी मनसेचे उपविभाग प्रमुख विश्वजित ढोलम यांना फेरीवाल्यांनी मारहाण केली.  राठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा दावा ढोलम यांनी केला आहे. त्या माराहाणीत ढोलम चांगलेच जखमी झाले असून, त्यांच्यावर महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, यापूर्वी मुंबईतील मालाड परिसरात मनसे विभाग प्रमुखाला फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मालाडमधील मनसेचे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांना मारहाण झाली होती. आता पुन्हा तसाच प्रकार घडला आहे. त्यामुळे राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे, संजय निरूपम राज ठाकरे आणि मनसेला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...