आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत शाळा-महाविद्यालयांनी जबाबदारी घेण्याची गरज- राज ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे - Divya Marathi
राज ठाकरे
मुंबई- मागील काही दिवसापासून शालेय व महाविद्यालयात घडणा-या घटनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना पत्र लिहले आहे.
 
राज ठाकरे आपल्या पत्रात लिहतात, मागील काही दिवसापासून ज्या काही घटना समोर आल्या त्यामुळे निराश झालो. या उदविग्नेतूनच तुम्हाला पत्र लिहित आहे. ज्या मुलांना व युवकांना आपण देशाचे भवितव्य म्हणतो त्यांच्या सुरक्षितेतबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शाळेत येणारे विद्यार्थी ही तुमच्या-माझ्या मुलां-मुलींसारखीच असतात. शाळेतील सर्व व्यवस्थापन व कर्मचा-यांनी योग्य ती काळजी घेतली तर सुरक्षेचा प्रश्नच येणार नाही. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
या कामासाठी माझी काही मदत लागल्यास मला कधीही संपर्क साधा, मी मदतीसाठी तयार आहे असेही राज यांनी पत्रात म्हटले आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, राज ठाकरेंनी लिहलेले जसेच्या तसे पत्र.... 
बातम्या आणखी आहेत...