आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या वाढदिवसाला कापला कर्जमुक्तीचा केक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त रेल्वे इंजिनाची प्रतिकृती कार्य़कर्त्यांनी भेट दिली. - Divya Marathi
राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त रेल्वे इंजिनाची प्रतिकृती कार्य़कर्त्यांनी भेट दिली.
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस दादर येथील त्यांच्या निवासस्थानी कर्जमुक्तीचा केक कापून साजरा करण्यात आला. मनसेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह यावेळी ओसांडून वाहत होता. कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांनी थेट संवाद साधला.
 
इंजिनाची प्रतिकृती देण्यात आली भेट
 
राज ठाकरे यांना कार्यकर्त्यांनी यावेळी इंजिनाची प्रतिकृती भेट दिली. ठाकरे यांनी कापलेल्या केकवर कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती हवी अशी घोषणा यावेळी लिहिण्यात आली आहे. महिला पदाधिकारी व लहान मुलेही यावेळी उपस्थित होत्या. कृष्णकुंजचा परिसर यावेळी कार्य़कर्त्यांच्या गर्दीने फुलुन गेला होता. 
 
बातम्या आणखी आहेत...