आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचे नवे व्यंगचित्र; ‘चिंतन’ बैठकीवरुन मोदी- शहांवर निशाणा, गडकरींनाही रेखाटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आणखी एका नव्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणे गरजेचे आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याचा दाखला त्यात देण्यात आला आहे.
 
भाजप मुख्यालयात ‘दिवाळी मिलन’ समारंभात पत्रकारांशी संवाद साधताना मोदींनी हे मत व्यक्त केले होते. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीबाबत नेहमीच चर्चा होते, मात्र त्यांची विचारसरणी, मूल्य तसेच अंतर्गत लोकशाहीबाबत फारशी चर्चा होत नाही असेही त्यांनी म्हटले होते.

मोदींच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रात नरेंद्र मोदी, अमित शहा यांना दाखवण्यात आले आहे. मोदी हे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्याला ‘माझे मत पटतंय का?’ असे दरडावून विचारताना दिसत आहेत. या व्यंगचित्रात नितीन गडकरी यांना भेदरलेल्या अवस्थेत दाखवण्यात आले आहेत. 
 
पुढील स्लाईडवर पाहा राज ठाकरेंनी काढलेली आणखी काही व्यंगचित्रे
बातम्या आणखी आहेत...