आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कृष्णकुंज\'वर एकाचवेळी दोन भारतरत्न, लतादीदी-सचिनकडून राजना शुभेच्छा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमीत्त शुभेच्या देण्यासाठी गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर, मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी गेले.
येथे सचिनने लता मंगेशकर यांच्या गायकीची तोंडभरून स्तूती केली. तो म्हणाला, 'मी लहान असताना वॉकमन आणि आता आयपॅडवर संगीत ऐकतो. यंत्र बदलत गेले गाणं मात्र लतादीदींचेच होते. त्या मला आईसारख्या आहेत.'
लतादीदीं म्हणाल्या, 'मी चांगले गाते की नाही माहित नाही. मात्र सचिन उत्तम क्रिकेटर आणि चांगला माणूस आहे.' क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे. त्याने क्रिकेटला अलविदा केले असले तरी, त्याने दुसरा एखादा खेळ खेळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी लतादीदींनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेले 'तु जहाँ जहाँ चलेगा... मेरा साया साथ होगा...' गाणे सचिनला भेट दिले. तर, सचिनने त्याची स्वाक्षरी असलेले एक टी-शर्ट लतादीदींना भेट दिले.

राज ठाकरेंनी दोघांचे स्वागत केले. ते म्हणाले, माझ्या घरात एकाच वेळी दोन भारतरत्न येण्याची ही पहिली वेळ आहे.

योगायोग
राज ठाकरे यांनी आज (रविवार) मनसेच्या कार्यक्रमात पक्षाचे लोकसभा निवडणूकीत विजयी झालेले उमेदवार पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा देतील, असे घोषित केले आहे. याआधी गानकोकीळा लता मंगेशकर यांनीही मोदींना देशाच्या पंतप्रधानपदी पाहाण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही तासांतच लतादीदी त्यांच्या घरी आल्या हा योगायोग आहे.
लतादीदी या राज्यसभेच्या माजी खासदार आहेत, तर सचिन काँग्रेसकडून विद्यमान खासदार आहे, आणि दोघेही भारतरत्न आहेत.

पुढील स्लाइजमध्ये आणखी छायाचित्र..