आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे- मुख्यमंत्र्यांची बैठक संपली, मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक उत्तर- बाळा नांदगावकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'वर्षा' बंगल्यावर आज (गुरुवार) दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

डोंबिवलीतील कलेक्टर लँडच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याशी संपर्कही साधला. नजराणा शुल्क संदर्भातील अडचणी सोडवण्यास पुढाकार घ्या, असे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर राज ठाकरे हे पक्षाची काय भूमिका जाहीर करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या मोर्चावर मनसैनिकांनी भिरकावले बटाटे
काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते यांच्यात काल (बुधवार) सकाळी दादरमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे फेरीवाल्यांच्या सन्मानार्थ काढण्यात येणारा काँग्रेसचा मोर्चा बारगळला. दुसरीकडे स्टेशन परिसरात व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना हाय कोर्टाने मनाई केल्यामुळे याप्रकरणी मनसेचे बळ वाढले आहे.

दरम्यान, मागील दोन आठवडे मुंबईत फेरीवाल्यांवरून मनसे अाणि काँग्रेस यांच्यात संघर्ष पेटलेला आहे. बुधवारी दादरमध्ये मुंबई काँग्रेसने फेरीवाल्यांच्या सन्मानार्थ एका मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू झाला. इतक्यात मनसेचे कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी काँग्रेसच्या मोर्चावर बटाटे फेकण्यास सुरुवात केली. लागलीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते भिडले आणि हाणामारी सुरू झाली. गोंधळाची शक्यता असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मनसे कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ते नितीन पाटील यांची मोटार गाडी फोडली. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम मोर्चात सामील नव्हते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... काँग्रेस-मनसे कार्यकर्त्यांत दादरमध्ये झालेल्या जाेरदार हाणामारीचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...