आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार, राज यांच्या आज दोन सभा; काय बोलतात? याकडे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांचा प्रचार दणक्यात सुरू आहे. जवळपास सगळेच पक्ष आपापल्या प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आता आखाड्यात उतरणार आहेत. राज ठाकरे आज (मंगळवारी) प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.  मुंबईत ते दोन सभा घेणार आहेत. राज ठाकरे काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे मुंबईत एकूण तीन सभा घेणार आहेत. त्यापैकी दोन सभा मंगळवारी विक्रोळीतील कन्नमवार नगर आणि विलेपार्लेमध्ये  तर उर्वरित एक सभा 18 फेब्रुवारीला दादरमध्ये आहे.
राज ठाकरे यांची पहिली सभा 6 वाजता मुंबईत  विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये होईल. त्यानंतर 7.30 वाजता विलेपार्ले येथे दुसरी प्रचारसभा होणार आहे. ठाकरे मुंबईबाहेरही सभा घेणार आहेत. ठाणे, नाशिक आणि पुण्यात ते सभा घेणार आहेत.

राज ठाकरेंच्या सभा कधी आणि कुठे? 
-मुंबईतील विक्रोळी- 14 फेब्रुवारी,सायंकाळी 6 वाजता 
-मुंबईतील विलेपार्ले- 14 फेब्रुवारी, सायंकाळी 7.30 वाजता
-ठाण्यातील दिवा- 15 फेब्रुवारी, सायंकाळी  6 वाजता
-पुणे- 16 फेब्रुवारी, सायंकाळी 7 वाजता 
-नाशिक- 17 फेब्रुवारी, संध्याकाळी 7 वाजता
-मुंबईतील दादर- 18 फेब्रुवारी, सायंकाळी 7 वाजता
बातम्या आणखी आहेत...