आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्याचा नळ जोडणीसाठी 12 हजारांची लाच घेताना मनसेचा नगरसेवक चतुर्भूज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सुरेश आवळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने(एसीबी) अटक केली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या वार्ड क्रमांक १२६ चे नगरसेवक सुरेश आवळे यांना लाच घेताना एसीबीच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले. नळ जोडणी देण्यासाठी नगरसेवक आवळे यांनी लाच मागितली होती. लाचेचे १२ हजार रुपये घेताना त्यांना एसीबीच्या अधिका-यांनी अटक केली आहे.

रमाबाई नगर येथील एका महिलेच्या तक्रारीवरून एसीबीने ही कारवाई केली.