आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 नगरसेवकांना पैसे दिल्याचा मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांचा आरोप, एसीबीकडे तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे. - Divya Marathi
मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे.
मुंबई- शिवसेना प्रवेशासाठी 6 नगरसेवकांना पैसे दिल्याचा आरोप मनसे नगरसेवक संजय तुर्डे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली आहे.
 
एसीबीला पत्र लिहून तुर्डेंनी ही माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेत मनसेची साथ न सोडलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
 
शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. भविष्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचं लांडेंनी सांगितले, असे संजय तुर्डे म्हणाले होते. गेल्या आठवड्यात मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. संजय तुर्डे हे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 चे नगरसेवक आहेत.
बातम्या आणखी आहेत...