आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोटी जात दाखवल्याने मनसेच्या मुंबईतील प्रियंका शृंगारे यांचे नगरसेवकपद रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 112 मधील मनसेच्या नगरसेविका प्रियंका शृंगारे यांचे नगरसेवक पद अखेर रद्द करण्यात आले आहे. सहायक निवडणूक व नगरशुल्क अधिकार्‍यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रानुसार 17 फेब्रुवारी 2012 पासून पद रद्द करण्यात आले आहे. महापौर सुनील प्रभू यांनी पालिका सभागृहात याची घोषणा केली आहे. शृंगारे यांना नगरसेवक म्हणून दिलेले भत्ते, मानधन, लाभ परत घेतले जाणार असल्याचे समजते.
विक्रोळी कन्नमवार नगर येथील प्रभाग क्रमांक 112 च्या नगरसेविका प्रियंका शृंगारे यांनी आपली जात ‘खाटीक’ असल्याचे दर्शविले होते. मात्र जात पडताळणी समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. त्यामुळे शृंगारे यांचे पद रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, मनसेने याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले आहे.
मनसेच्या नगरसेविकेचे पद रद्द करण्यात आल्यामुळे या कालावधीत त्यांना देण्यात आलेले लाभ, भत्ते, मानधनही परत घेतले जाऊ शकते. नगरसेवकांना दिलेले लॅपटॉप, मोबाईल बिले यासह अनेक लाभांबाबत निर्णय विधी खात्यातर्फे घेतला जाईल. तसेच शृंगारे यांच्या जागी दुसर्‍या क्रमांकाच्या उमेदवार शिवसेनेच्या श्रद्धा रुके यांची वर्णी लागणार की पुन्हा पोटनिवडणूक घेणार याबाबत निर्णयही लवकरच घेण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत लवकरच पोटनिवडणूक होईल.