आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Declered 153 Candidate For Upcoming Assembly Election

जगात जे जे चांगले ते ते महाराष्ट्रात हवे - राज ठाकरे; वाचा, मनसे उमेदवारांची यादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील 153 मतदारसंघात आपल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. यात सर्व विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी आपल्या उमेदवारांची यादी पक्षाच्या वेबसाईटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. राज ठाकरे मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करत आहेत.
मुंबईत षण्मुखानंद सभागृहात राज ठाकरे काय-काय म्हणाले... वाचा...
- माझ्या ब्ल्यू प्रिंटची अनेकांनी चेष्टा केली
- वीज-पाणी-रस्ता-रोजगार यापलीकडे आपण विचार करणार आहोत की नाही
- त्याच-त्याच मुद्यांवर किती निवडणुका लढवायच्या
- ब्ल्यू प्रिंट टायमिंगलाच सादर करायची असते
- निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ब्ल्यू प्रिंट नाही
- जगातील पहिला विकास आराखडा सम्राट अशोकांनी मांडला होता
- सम्राट अशोकांचे शिलालेख पाहिल्यास तुम्हाला ते पाहता येईल.
पुढे स्लाईडच्या माध्यमातून राज्यातील 153 मतदारसंघातील मनसेच्या उमेदवारांची यादी व त्यांची नावे...