आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Demand Take Strong Action Against Adarsh Society

आदर्श सोसायटीवर कारवाई करा, मनसेची मागणी; महापौर काय कारवाई करणार याकडे लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आदर्श सोसायटीने बेस्ट परिवहन सेवेच्या भूखंडाचा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएएसआय) नियमभंग करून वापरल्याप्रकरणी त्यांच्यावर एमआरटीपी अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई करा, अशी मागणी मनसेने मुंबईच्या महापौरांकडे एका पत्राद्वारे केली आहे. हे पत्र म्हणजे महापौरांवर कारवाईसाठी दबाव तर आहेच, पण त्यावर कुठलाही निर्णय महापौरांनी घेतल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा मनसेला होणार आहे.
राज्य सरकारने विधिमंडळात आदर्शचा अहवाल मांडला. या अहवालाच्या पान क्रमांक 225 वर आदर्श सोसायटीने लगतच्या बेस्ट आगारासाठी राखीव असलेल्या भूखंडाचा एफएसआय नियमबाह्य पद्धतीने वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे एमआरटीपी अ‍ॅक्टच्या कलम 50 चा भंग असल्याचेही आयोगाने आपल्या अहवालात नमूद केले.
एमआरटीपी अ‍ॅक्टचा भंग झाल्यास त्यावर कारवाई करण्याचा अधिकार मुंबई महापालिकेला असून तशी कारवाई करण्याचे आदेश महापौर या नात्याने आपण द्यावेत, अशी विनंती मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. विधिमंडळात हा अहवाल फेटाळल्यामुळे विरोधकांनी सरकारच्या हेतूवर शंका घेत सरकारला धारेवर धरले होते. हा अहवाल फेटाळणे म्हणजे राजकीय नेते अणि नोकरशाहांना वाचवण्याचा प्रयत्न आहे, असे सांगत शिवसेनेने सरकारवर टीका केली होती. त्याच सेनेची सत्ता पालिकेत आहे. त्यामुळे आपल्या अधिकारातील कारवाई करत महापौरांनी सरकारने केलेली चूक सुधारावी, आणि विधिमंडळात आपल्याच पक्षाने मांडलेल्या भूमिकेला न्याय द्यावा, असा सल्ला अप्रत्यक्षपणे मनसेने दिलाय.
कारवाई झाल्यास त्याचे श्रेय मनसेला मिळेल. कारवाई न केल्यास पालिकेतील सत्ताधाºयांवर टीका करण्याची संधीही मनसेला मिळेल. त्यामुळे पत्राद्वारे कारवाईची मागणी करत मनसेने महापौरांची
अडचण केली आहे.