आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Demands Resignation Of Ministers Vinod Tawde & Pankaja Munde, Following Allegations Of Corruption.

आग लागल्याशिवाय धूर निघत नाही, तावडे-पंकजांनी राजीनामा द्यावा- मनसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. त्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे व महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. सदर चौकशी होईपर्यंत दोघांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन निपक्ष चौकशीस समोरे जावे व आघाडी सरकारपेक्षा आम्ही वेगळे आहोत हे दाखवून द्यावे असेही मनसेने म्हटले आहे.
पक्षाचे सरचिटणीस व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी याबाबत परिपत्रक काढून एक निवेदन दिले आहेत. त्यात ही मागणी करण्यात आली आहे. सरदेसाई यांनी निवेदनात म्हटले आहे की, आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून महाराष्ट्राच्या जनेतेने शिवसेना-भाजपला कौल दिला आहे. स्वच्छ प्रतिमेचे व अभ्यासू असे देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. प्रसारमाध्यमांनी त्यांचे भरपूर कौतूक केले ते त्यास पात्रही आहेत. मात्र, सरकार येऊन वर्षभरही झाले नाही तोच राज्यातील जनतेच्या पदरी निराशा येऊ लागली आहे. भाजपच्या मंत्र्यांवर सुद्धा शेकडो कोटी रूपयांचे गैरव्यवहाराचे आरोप होऊ लागले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
PARTY WITH A DIFFERENCE म्हणून टेंबा मिरविणारा भाजप हा मागील सरकारप्रमाणेच वागू लागला आहे. 14 वर्षे सत्तेच्या बाहेर राहिल्याने यांची 'भूक' वाढली की काय? असा सवाल जनतेला पडू लागला आहे. युती सरकार सुद्धा आघाडी सरकारचीच धोरणे आणि 'दर करार' पुढे रेटताना दिसत आहेत. युती सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री तर झाला आरोप की दे क्लीन चिट अशी भूमिका मांडत आहेत, अशी टीका नितीन सरदेसाई यांनी परिपत्रकातून केली आहे.
पुढे वाचा, नितीन सरदेसाईनी काढलेले परिपत्रक...