आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mns Denies Nitin Gadkari\'s Offer To Joins In Mahayuti

राज ठाकरे गडकरींची \'ऑफर\' धुडकवणार, मनसे नेत्यांचाच विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपच्या उमेदवारांना मनसेने पाठिंबा द्यावा, अशी भाजप नेते नितिन गडकरी यांनी दिलेली ऑफर मनसेचे प्रमुख राज ठाकरे धुडकावून लावणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. नितीन गडकरी यांनी काल राज ठाकरे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीला मनसेने उमेदवार उभे करू नयेत किंवा कमीतकमी उभे करावेत, अशी ऑफर देत आगामी विधानसभेत त्याची कसर भरून काढली जाईल, असे आश्वासन दिले होते. या ऑफरला मनसेतील नेत्यांनाच प्रचंड विरोध असल्याचे कळते. गडकरींनी दिलेल्या ऑफरनुसार वागलो तर आपलेच राजकीय खच्चीकरण होईल व भविष्यातील पक्षवाढीसाठी आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेत असल्याचे मनसेच्या नेत्यांनी राज यांच्याकडे नकाराचा पाढा वाचला आहे. तसेच आज होणा-या मनसेच्या बैठकीत हाच मुद्दा बहुतेक नेते लावून धरणार आहेत. तरीही राज ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे सांगत राज यांच्या पुढे जाणार नाही असे म्हटले आहे.
मनसेची बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत सुरु झाली आहे. या बैठकीत लोकसभेसह भाजप-सेनेसह सर्वच विषयावर होणार असल्याचे कळते.
गडकरी यांनी राज यांची भेट घेऊन महायुतीच्या संभाव्य वाढीबाबत चर्चा केली असली तर मनसे नेत्यांचा महायुतीत सामील होण्यास व लोकसभेसाठी उमेदवार उभे न करण्याच्या निर्णयाला विरोध आहे. मनसे पक्ष सध्या लहान आहे व तो वेगाने वाढतो आहे. जर आपण महायुतीत गेलो तर पक्षवाढीला मर्यादा येतील. तसेच भविष्यात राजकीय भूमिका घेताना अडचण येईल. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उमेदवार उभे करून आपणही आपली ताकद अजमावली पाहिजे. महाराष्ट्रासह देशातील राजकारण झपाट्याने बदलत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही ठोस भूमिकेशिवाय अशा तत्कालीन तडजोडी करणे पक्षाला घातक ठरेल. तरूण पिढी मनसेकडून वळणार नाही. तसेच पक्षातही वेगवेगळ्या शहरात नेतृत्त्व विकास होणार नाही. त्यामुळे भाजपचा अथवा एनडीएचा विचार न करता आपण आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. जर आपण ताकद दाखवून देण्यास यशस्वी ठरलो तर आगामी विधानसभेत 50 आमदार निवडून येण्यापासून आपल्या पक्षाला कोणीही रोखू शकणार नाही, असा मनसेच्या नेत्यांचा सूर आहे. हीच भूमिका मनसेतील प्रमुख नेते पक्षप्रमुख राज ठाकरेंकडे मांडणार आहेत. राजही या मताशी सहमत आहे असे सूत्रांनी स्पष्ट केले.
नितीन गडकरी हे चांगले व सकारात्मक विचार करणारे राजकीय नेते आहेत. मात्र त्यांनी दिलेली ऑफर भाजप व एनडीएच्या फायद्याची आहे. त्यांच्या जागेवर कदाचित ते बरोबर असतीलही. मात्र मनसेला यातून काहीही फायदा होणार नाही. उलट असे करून आपण भविष्यातील वेगवेगळ्या भूमिकांविषयी अडचणीत येणार आहे त्यामुळे सध्या तरी 'एकला चलो रे...' नारा योग्य ठरेल असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.