Home »Maharashtra »Mumbai» Mns Disturb The Central Bank Of India's Examination;Agitation On Non State Resident, Interview Cancelled

मनसेने उधळली सेंट्रल बँकेची परीक्षा ; परप्रांतीयाच्या मुद्द्यावरून आंदोलन, मुलाखत रद्द

प्रतिनिधी | Feb 23, 2013, 07:10 AM IST

  • मनसेने उधळली सेंट्रल बँकेची परीक्षा ; परप्रांतीयाच्या मुद्द्यावरून आंदोलन, मुलाखत रद्द

मुंबई - सेंट्रल बँकेतर्फे लिपिक पदासाठी शुक्रवारी मुंबईत घेण्यात आलेली मुलाखत व भरती परीक्षा परप्रांतीयांना अधिक स्थान दिल्याच्या मुद्द्यावरून मनसेने उधळून लावली. तसेच मुलाखतीही रद्द करण्यास भाग पाडले.
सेंट्रल बँकेने देशभरातील 3180 लिपिक पदांसाठी गेल्या वर्षी लेखी परीक्षा घेतली होती. यात 1800 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. महाराष्ट्रासाठी 429 जणांचा कोटा आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुक्रवारी मुंबईत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. मनसे प्रवक्ते शिरीष पारकर यांनी सांगितले की, या 1800 उमेदवारांपैकी फक्त 15 टक्के विद्यार्थी स्थानिक असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्याचा निषेध करत मनसेतर्फे सेंट्रल बँकेच्या फोर्ट ऑफिस येथे निदर्शने करण्यात आली.

ज्या उमेदवारांना मराठी येत असेल व ज्यांच्याकडे डोमिसाइल प्रमाणपत्र असेल अशाच मुलांना मुलाखतीसाठी बोलवावे, अशी मागणी बँकेच्या जनरल मॅनजरकडे करण्यात आली. मॅनेजरनी आपली चूक मान्य करून परप्रांतीय उमेदवारांना परत पाठवले आणि मुलाखती रद्द केल्या.तसेच मनसेच्या पाठपुराव्यानंतर स्टेट बँकेच्या कॉल सेंटरमध्येही 15 दिवसांत मराठी भाषेत काम सुरू करण्याचे आश्वासनही बॅँकेने दिले.

Next Article

Recommended