आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मनसे’ची वक्रदृष्टी आता गुजराती दांडियावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील गरब्यात दांडिया खेळण्यासाठी हजारो रुपयांचे तिकीट आकारण्यात येते. गरबा आयोजक लाखाेंचे प्रायोजकत्व मिळवत असतात. मग अशा गरबा मंडळांना पालिकेची मैदाने अल्प शुल्कात कशासाठी, असा सवाल मुंबई महापालिकेत ‘मनसे’ने उपस्थित केला असून दांडियाच्या आयोजकांनाही गणपती मंडळांप्रमाणेच व्यावसायिक दराने मैदाने द्यावीत, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

१ आॅक्टोबरपासून नवरात्राला सुरुवात होत आहे. मुंबईत या काळात गरब्याची मोठी धामधूम असते. गरब्याचा समावेश धार्मिक उत्सवांच्या वर्गवारीत करावा, अशी मागणी मुंबईतील गुजराती समाजाची अाहे. त्यामुळे आयोजकांना महापालिकेची मैदाने नि:शुल्क मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे. त्यालाच मनसेने आक्षेप घेतला आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आहे. पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे गुजराती मतदारांना आपलेसे करण्यासाठी भाजपची कसरत सुरू आहे. मात्र, त्याच वेळी मराठी मने आपल्या बाजूला करण्यासाठी मनसे विविध आंदोलने करत आहे. कोटींत उलाढाल असल्याचे कारण देत गरबा आयोजकांना व्यावसायिक दराने मैदाने देण्यात यावीत, अशी मागणी मनसेने केली आहे.

मुंबईतील गुजराती समाज भाजपचा पारंपरिक मतदार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आपली गमावलेली स्पेस शोधत असून मनसेने मराठीचा मुद्दा आक्रमकतेने मांडण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. दांडियाबाबतची मनसेची भूमिका त्याचाच एक भाग मानण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...