पुणे - 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'मधील विद्यार्थ्यांनी एफटीआयआयच्या वादावर तोडगा न निघाल्याने आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. हिमांशू शेखर, अलोक अरोरा आणि हिलाल सावेद हे तिघे दुपारी 12 वाजल्यापासून उषोषणास बसले आहेत. गजेंद्र चौहान यांची संचालक मंडळाच्या अध्यक्षपदावरची नियुक्ती रद्द करावी, यासाठी विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. तर या वादावर कायमचा पडदा पडावा, यासाठी सिनेजगतातील 180 दिग्गज मंडळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना सह्यांचे निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती करणार आहेत.
गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी संप पुकारला असून त्याला तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. भारताची चित्रपट क्षेत्रातील प्रमुख संस्था असलेल्या एफटीआयआय विद्यार्थ्यांच्या संपाकडे सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक नामवंत कलाकार, विचारवंत आणि राजकीय पक्षांनी सरकारवर टीका केली आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा..
मनसेचा विनामुल्य मासेविक्रीचा स्टॉल, पोलिसांसोबत झाली बाचाबाची
'जैनांनो, मुसलमानांच्या मार्गाने जाऊ नका!!' 'सामना'च्या अग्रलेखातून टीका
चार दिवसात राज्यात जोरदार पावसाची शक्यता