आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे बरेच कुत्रे भुंकतात, हत्‍ती चालत राहतो; मनसेचा वारीस पठाण यांच्‍यावर पलटवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज ठाकरे म्‍हणजे विझलेला दिवा, अशी टीका करणा-या एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांना मनसेने आज जोरदार प्रत्‍युत्‍तर दिले.  असे बरेच कुत्रे भुंकत राहतात, हत्‍ती चालत राहतो, अशा शब्‍दांत मनसेने वारीस पठाण यांच्‍यावर पलटवार केला आहे.


काय आहे प्रकरण? 
अनधिकृत फेरीवाल्‍यांचा मुद्द्यावरुन वातावरण पेटलेले असतानाच एमआयएमने या वादात उडी घेतली आहे. फेरीवाल्‍यांची बाजु घेताना वारीस पठाण म्हणाले, 'राज ठाकरेंची राज्‍यातील सत्‍ता जवळपास संपल्‍यात जमा आहे. त्‍यांच्‍यासोबत एक आमदारही नाही. महापालिकेतही त्‍यांचे काहीच नाही. स्‍वत:ला जिवंत ठेवण्‍यासाठी बिचा-या गरीब फेरीवाल्‍यांना मारतात. हिमंत असेल तर भायखळ्यता येऊन तोडफोड करा. मग तुम्‍हाला दाखवतो', अस खुल आव्‍हानच त्‍यांनी राज ठाकरेंना दिले. तसेच 'राज ठाकरे म्‍हणजे बुझा हुआ दिया है', अशा बोच-या शब्‍दात त्‍यांनी राज ठाकरेंवर टीका केली. ईद-ए-मिलाद निमित्त वारीस पठाण सोलापुरात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल.

 

मनसेचा पलटवार 
वारीस पठाण यांच्‍या टीकेनंतर मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्‍लेदार यांनी वारीस पठाण यांच्‍यावर जोरदार हल्‍लाबोल चढवला. 'वारिस पठाण मुर्ख माणूस आहे. त्‍यांनी एकही असे काम केले नाही ज्‍याची दखल घेतली जार्इल. त्‍यामुळे प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी ते वादग्रस्‍त वक्‍तव्‍य करतात. असे भुंकणारे कुत्रे बरेच असतात, हत्‍ती त्‍याच्‍या डौलाने चालत राहतो.' राज ठाकरे विझलेला दिवा आहे, या टीकेवर उत्‍तर देताना ते म्हणाले, 'असे असते तर राज ठाकरे यांच्‍या मोर्चांना, सभांना लाखोंची गर्दी झाली असती का? दीड वर्षांनंतर निवडणुका आहे तेव्‍हा कळेलच कोण विझलेला दिवा आहे' यावेळी यशवंत किल्‍लेदार यांनी वारीस पठाण यांना ईदच्‍या शुभेच्‍छाही दिल्‍या.    

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, अनधिकृत फेरीवाल्‍यांविरोधात राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि त्‍यानंतर मनसेच्‍या कार्यकर्त्‍यांनी केलेले खळखट्याक आंदोलन... 

 

 

बातम्या आणखी आहेत...