आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे नेते अतुल सरपोतदार यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनसेचे सरचिटणीस आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय अतुल सरपोतदार (51) यांचे गुरुवारी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शुक्रवारी वांद्रे येथे त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे.
संध्याकाळी 7.30 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने अतुल यांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. राज ठाकरे शिवसेनेत विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असताना त्यांच्या महत्त्वाच्या पदाधिका-यांपैकी अतुल एक होते. त्यांनी कधीही निवडणूक लढविली नव्हती. वडील शिवसेनेचे नेते मधुकर सरपोतदार यांचा राजकीय प्रवास जवळून पाहिलेल्या अतुल यांनी शिवसेनेबरोबरच मनसेतही अनेक महत्त्वाची पदे भूषवली. पक्ष स्थापनेपूर्वीपासून राज यांच्याबरोबर असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी ते एक होते. त्यांच्यावर पक्षाच्या मराठवाडा संघटकपदाची जबाबदारी होती. त्यांच्या पश्चात पत्नी शिल्पा सरपोतदार आणि मुलगा असा परिवार आहे.