POLL:कल्याण-डोंबिवलीकरांना मनसेच्या बाळा / POLL:कल्याण-डोंबिवलीकरांना मनसेच्या बाळा नांदगावकरांचे विनम्र आवाहन, वाचा...

Oct 31,2015 03:53:00 PM IST
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना केलेले विनम्र आवाहन
माता-भगिनी, बांधवांनो,

सविनय जय महाराष्ट्र !
कल्याण-डोंबिवलीमधील सर्व पक्षांचे भवितव्य आपण रविवारी ठरविणार आहात. निवडणुक काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षाने विकासाच्या मुद्दयांवर भाष्य केले नाही. याउलट त्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवरच आरोप करुन कुरघोडी करण्यात धन्यता मानली. आज कल्याण-डोंबिवली या शहरांचा अक्षरशा बोजवारा उडाला आहे. रस्त्यांची चाळण झालीय, अरुंद रस्त्यांमुळे ट्रॅफिकचा बट्याबोळ, चालण्यास फुटपाथ नाही, 5 वर्षांनी निवडणुका आल्या की रस्त्यांच्या कामाला सुरूवात होते हे आता नेहमीचेच झाले आहे. पूर्व-पश्चिमेला जोडणारा एकच पूल तो देखील अरुंद, एवढ्या वर्षानंतर देखील काहीच नियोजन नाही.
आरोग्यासाठी महापालिकेची सुसज्ज अशी रुग्णालये नाहीत. पाण्यासाठी आजही स्वत:चा असा जलसाठा नाही. मुंबई मनपा चे जसे तलाव आहेत त्याप्रमाणे व्यवस्था नको करायला. आजही उघडी गटारे शहराची दुर्गंधी वाढवत आहे काहिही नियोजन नाही, कच-याचा प्रश्न तसाच प्रलंबित, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरळीत नाही, रोज जीव मुठीत घेऊन घरी परतावे लागते आहे. नागरिकांनो किती दिवस आपण हे सर्व सहन करणार आहोत. आता वेळ आली आहे हे सर्व बदलण्याची.
प्रबळ इच्छाशक्तीच्या जीवावर सन्माननीय राजसाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सर्व बदलू शकते. त्यासाठी हवी आहे तुमची ईच्छाशक्ती जी मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, कारण येथे बदल घडविणे केवळ तुमच्या आणि तुमच्या हातात आहे. संधी 5 वर्षांनी एकदा येते आता तुम्हाला ठरवायचे आहे. पुन्हा त्याच नाकर्त्या सत्ताधा-यांना संधी देणार की ज्यांनी सुंदर आणि सुसज्ज असे नाशिक शहर घडविले ते विकासाचे वास्तव आपणांसमोर मांडले त्या सन्मा. राजसाहेबांना एक संधी देणार. निर्णय तुमचाच, पुन्हा भावनेच्या आहारी जाऊन बळी पडणार की योग्य निर्णय घेऊन शहरांचा सुंदर असा विकास साधणार.
एक सुंदर शहर ज्याचा आपल्याला अभिमान वाटेल, ते घडविण्यासाठी ठाम निर्धार करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना आपण 'रेल्वे इंजिन' या निशाणी समोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे. ही आपणांस कळकळीची नम्र विनंती.
धन्यवाद !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
आपला नम्र
बाळा नांदगांवकर
मनसे नेते
X